Monday, October 24, 2016

बायको 'करती' झाली

किती एक गोष्टी करायच्या राहिल्या. किती एक गोष्टी मनात राहिल्या.

खूप कार्य पार पाडली, पण 'मनात'. दिवास्वप्नात खूप टाळ्या, पाठीवरल्या थापा अनुभवल्या. आवडत्यांच्या कौतुकावर स्वार होउन तोच स्वप्नील अनुभव खरा असं मानलं.

खिशातून पैसे न काढता, समोरच्याला याचक 'बनवून' त्याचं वैचारीक गरीबी निर्मुलन केलं. कित्येकांना लांबून सल्ले, कित्येकाना मार्गदर्शन - जीवनांच ध्येय वगैरे वगैरे...

सर्वांना समजवून सांगणं हा अधिकार, लिमिटेड जगाचा लिमिटेड अनुभव, तरीही इतरांपेक्षा जास्त. म्हणून अधिकाराचं कर्तव्यात रूपांतर. वर, ज्ञानाचा उपयोग करून घेईल तो शहाणा, न घेईल तो आडमुठा, हा न्याय!

क्रिटीक बाय प्रोफेशन अँड नेचर
ओळखीत कोणी तरी काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करत असतं. पण त्यातले तोकडेपण शोधलं. फीडबॅक मागणाऱ्याला 'मनापासून' देऊन उपकृत केलं. फीडबॅक न मागणाऱ्याला तो कुठल्या तरी मार्गाने तो पोहोचेल अशी व्यवस्था केली,  ज्यांना थेट सांगता येणार नाही त्यांच्या कामाचं जाहीर पृथ्थकरण केलं. रांगत्या बाळकडूनही फ्लॉलेस डिलीव्हरीची अपेक्षा!

आणि समजूत करून-करवून घेतली की हाच देव, हेच कार्य.

जेव्हा हात मातीत घालायची वेळ आली, तेव्हा वेळ नाही, त्राण नाही, सवड नाही, कपडे घाण झाले तर बायकोला त्रास, अनेक चिकटपट्ट्या. मातीत चिकटपट्टी काम करत नाही.

काय केलं, काय नाही, पण या 'नाही' ला खोडत, बायको 'करती' झाली

No comments:

Post a Comment

सदर १ः मनाशी संवाद टेलेपॅथी (दूरमनोसंप्रेषण) च्या नेटवर्क वर तीन मेंदूचा संवाद घडवून आणला गेला काही दिवसांपूर्वी ! मेंदूच्या लहरी समजण...