Tuesday, January 1, 2019


सदर १ः मनाशी संवाद


टेलेपॅथी (दूरमनोसंप्रेषण) च्या नेटवर्क वर तीन मेंदूचा संवाद घडवून आणला गेला काही दिवसांपूर्वी ! मेंदूच्या लहरी समजणाऱ्या आणि प्रक्षेपित करण्याऱ्या यंत्रांचा वापर करून, वॉशिंगटन युनिवर्सिटी आणि कार्नेगी मेलन युनिवर्सिटी च्या शास्त्रज्ञांनी हा खेळ करून दाखवला. खरचं. ती तीन माणसं कॉम्प्युटर गेम खेळली एकमेकांशी टेलेपॅथीने संवाद साधत. एक जण खेळत होता आणि इतर दोन मित्र त्याला सांगत होते कसं खेळायचं ते. आणि ते सुद्धा एकमेकांपासून खूप खूप लांब बसून आणि कॉम्प्युटर ला हातही न लावता!

तुम्हालाही कधी कधी तुमच्या फ्रेंडच्या मनातलं न सांगता कळतं ना. आजी आजोबा नी सांगितलं तसं, उचकी लागली किंवा जिभ चावली की कोणीतरी आठवण काढली असं म्हणतात. मग आपल्याला वाटतं, 'बहूतेक मावशी ने आठवण काढली असेल' आणि फोन लावला तर ते खरंच निघतं. किती मस्त वाटतं ना तेव्हा. मग विचार करा, की जर आपल्या मेंदूला एवढं कळतं तर मोबाईलची गरजच काय?

मोबाईल!
मोबाईल जाणार आता. आपण लवकरच मोबाईल शिवाय एकमेकांशी बोलायला शिकणार. "हातच्या काकणाला आरसा कशाला" ही जी म्हण आहे तशी नवीन म्हण निघेल "मनांच्या संवादाला मोबाईल कशाला". सगळं मनातल्या मनात बोलायचं. चार्जिंग संपलं, रेंज नाही, नंबर अस्तित्त्वात नाही, भानगडचं नाही. कर्कश्य रिंगटोन नको, सकाळचे घाबरवून टाकणारे अलार्म नकोत, गोड आवाजात आई मनातल्या मनात हाक मारेल आणि मी एकदम प्रसन्न मनाने उठीन. आणि आई रागावली तर.... नको रे बाबा !

अभ्यास करताना काहीतरी विसरायला झालं तर मित्र-मैत्रिणींची आठवण काढायची, ज्यांना येत असेल ते सगळे उत्तर देतील. नेटवर्क मध्ये अभ्यास करायचा आणि काय एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. एखाद्याने जरा कंटाळा केला तर सगळ्यांनी चिअर-अप करायचं, कुणालाच कळलं नाही तर मोठ्यांना किंवा वेळ असेल तर शिक्षकांना रीक्वेस्ट करायची. डायरेक्ट एखादी गोष्ट मनात शिरली तर, शिक्षक किती खुष होतील. त्यांना जे साध्य करायला जीव आटवून मेहनत करावी लागते, ते आता सहज साध्य होईल. सगळं थेट मुलांच्या मनात (भेज्यात चालेल का) घुसवायचं. अभ्यासच का? कसलीही अडचण आली, पुढे धोका दिसला, रस्ता सापडेनासा झाला, शब्द कोड सुटायला एकच रकाना बाकी आहे, अमिताभ विचारतोय, ' क्या इस जवाब पे ताला लगाया जाये?', अहा! पण हे परीक्षेत नाही चालायचं बर का. मी परीक्षेच्या वर्गात जॅमर (सगळ्या प्रकारच्या माहितीच्या लहरी अडवणारं यंत्र) लावून ठवलाय.

सगळ्यांचा एकटेपणा दूर होईल, सगळे मनानी जवळ येतील. त्यासाठी वॉट्सअॅप सारख्या माध्यमाची कुसंगती नको. फेक न्युज नको की वाईट बातम्या नकोत. गॉसिपिंग करा मनात मनात आणखी वर खुदकन हसा. कोणाला काही कळणार नाही, तुमच्या सोशल नेटवर्क नसले तर. हे एक सोशल नेटवर्क च आहे, मनांचं मनाशी जोडलेल. आणि हो, तुमचा टॉमी, तुमची मनी नुसते भाव भाव म्याव म्यावं करणार नाहीत. तुमच्या कुटुंबाचे ते महत्त्वाचे सदस्य "आज जेवण खूपच मस्त होतं, आई," "ताई, छत्री घेऊन जा, पाऊस पडणार आहे जोरात दुपारी" असं मनापासून सांगतील. नाहीतर दिवसरात्र नुसतेच "सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला" भसाड्या आवाजात गात राहतात. आणि झाडं...?

कस काम करेल हे ?
एका माणसाची टीम - माणूस एक पण मेंदू अनेक. विचार करा, अश्या अफाट बौद्धिक क्षमतेच्या माणसासाठी काय अशक्य आहे. Artificial intelligence पेक्षा हे अधिक चांगलं नाही का?

माणूस शिकेल तेंव्हा शिकेलच, पण आत्तातरी, दोन वेगवेगळी संशोधने या शक्तीला बुस्ट करण्यासाठी काम करताहेत त्यातला एक प्रकार म्हणजे रोपण. आत्ता या घडीला खूप वेगवेगळ्या प्रकारची मेंदू अनुवृद्धी रोपण ( ब्रेन बूस्टिंग इंप्लांट्स) अस्तित्त्वात आहेत - काही वैद्यकीय उपचारांसाठी जसे पार्कीनसन्स, सीझर्स आणि डीप्रेशन, श्रवण दोष तर काही मेंदूची क्षमतावृद्धीसाठी जसे स्मरणशक्ती, हेरगिरी, तर काही ज्ञानेंद्रियांच्या आणि मेंदूच्या अभ्यासासाठी. हे झालं इंवेसिव्ह तंत्र किंवा ऑपरेशन करून रोपण करण.

दुसरा सोपं (त्यामानाने). पोहण्याची टोपी असते ना, तशी टोपी घालायची त्यावर इलेक्ट्रिक activity संवेदना गोळा करणारे रिसेप्टर असतील. हे सगळे सिग्नल तुम्हाला हव्या त्या व्यक्ती पर्यंत पोचवतील. हा नॉन इन्वसिव्ह - कापाकापी न करता केलेला उपद्व्याप. अधिक माहितीसाठी पहा:

तुम्ही काय निवडणार? टोपी घेतली तर तिची फॅशन येऊ शकेल असा तिचा आवाका आहे - हॅरी पॉटर मधली बोलणारी टोपी आठवते का? ती याच तंत्रज्ञानाचा एक कलाविष्कार आहे.

चिप निवडली तर....

करा विचार आणि कळवा आम्हाला

Thursday, July 20, 2017


होडी हरवलीय


“कागद दुमडून विमानं करायला लागलीयत सगळी जणं, सोपी सुंदर होडी कोणी बनवतंच नाही, पावसात होड्या सोडणं तर दुरच,” काटदरे बाईंचं असं हताश बोलणं ऐकून समीरने ठरवलं.

त्या रात्री, नाजूक हातानी त्याने ३०-४० रंगीबेरंगी वेगवेगळ्या कागदांच्या होड्या बनवल्या आणि सकाळी शाळेत नेल्या पिशवीत भरून. बाईंनी एक-एक होडी मोठ्या आवडीने बघितली आणि जवळपास प्रत्येक होडी मी घेवू का असं विचारलं. समीर चा आनंद त्याच्या छोट्याश्या डोळ्यात मावत नव्हता. लाल जिलेटीन पेपरची होडी तर फारच ऊठून दिसत होती, समीरसारखीच नाजूक होती ती. बाईंनी आपल्या पदराने समीर चे डोळे पुसले, अगदी आई पुसते ना तसे. म्हणाल्या, “असा रडतोस कशाला? येवढ्या सुंदर होड्या बनवल्यास ना, मग! आता पाऊस पडला ना, की या होड्या पाण्यात सोड आणि त्यांचे फोटो काढायला सांग आईला”

आणि दुसऱ्याच दिवशी पाऊस पडायला सुरवात. “अगदी जोSSडात”, समीर म्हणतो ना तसा, जराही थांबला नाही. काटदरे बाई शाळेत जाऊच शकल्या नाहीत. सारखं त्यांचं मन त्यांना शाळेकडे ओढत होतं. पावसाने सकाळी एवढा काळोख केला होता की सांगता सोय नाही. आणि धो धो पावसात काही काम ही सुचत नव्हतं. डोक्यात समीरचेच विचार सारखे येत होते.

समीर काही ब्राईट मुलगा नव्हता, मागेच असायचा प्रत्येक गोष्टीत. पण काल समीर ‘छा गया’. वेळ जाता जात नव्हता, घरातली कामं तर सकाळीच झालेली. घरात पोस्टर पेपर होताच, त्यावर त्यांनी समीरच्या होड्या चिकटवल्या आणि खाली नाव लिहिलं, कलाकार :  समीर, इयत्ता दुसरी. त्यांची मुलगी नीमा, उठायच्या आत पोस्टर तयार झालं म्हणून बरं, नाहीतर तिने मध्ये लूडबूड केली असती किंवा होडी मागितली असती पाण्यात सोडायला.

नीमाला जाग आली तेव्हा तिला कळलं की आज काहीतरी वेगळं आहे. आज आईने झोपेतून उठवलं नाही. सुट्टीचा वार नाही पण आई बाबा घरी? “आज डे-केअर ला शुट्टी! आणि जोSडात पाऊस.” नंतर तिला कळलं की पावसामुळेच आज सगळे घरी आहेत. आवरून झालं तसं ती मागेच लागली, “होडी हवी, पाऊसात खेळायचंय, मॅगी खायचंय, गाडीतून भूर जायचंय” नुसती न संपणारी यादी. बाबांनी तिला कडेवर घेतलं आणि दोघेही भूर गेले. बाईंनी नेहमीप्रमाणे बरोबर जायचं टाळलं.

काटदरे बाई घरात एकट्याच. मोबाईल वर येणाऱ्या मेसेजमधून पावसाचे कारनामे कळत होते. शाळेत कोणी आलं नसेल तर बरं होईल. खास करून आपल्या वर्गातली छोटी मुलं. ती पावसात मजा करत असतील, नीमा सारखी? त्यांना त्यांचे बाबा फिरायला नेतील का? समीर काय करत असेल? पावसाबरोबर सगळा दिवस असाच वाहून गेला. नीमा खेळून, भिजून संध्याकाळी लवकर झोपली. इतर खेळण्यांबरोबर सर्दी पण घेऊन आली होती.

सकाळी बाई लवकरच पोचल्या शाळेत. सगळे आले होते वर्गात, समीर सोडून. समीरचं पोस्टर बाईंनी वर्गातल्या भिंतीवर लावलं. सगळ्या मुलांनी ते पोस्टर जवळ जाऊ बेंचवर चढून बघितलं. समीर असता तर खुष झाला असता. पावसात भिजला असेल आणि नीमासारखा... पण मी नीमाला तर डे केअर मध्ये कोंबून आलेय. डोळ्याच्या कडा पाणावल्या या विचाराने.  भरभर दिवस संपवून बाई घरी गेल्या. नीमा ला घट्ट मिठी मारली. नीमाच्या खांद्यावर परत पाऊस पडला.

दोन दिवसांच्या सुट्टीनंतर, समीर शाळेत आला, लपून छपून रडत होता, डाव्या गालावर लाल लाल पट्टे होते त्याच्या. बाईंनी समीरला जवळ घेतलं आणि विचारलं. “मी नाेटेची होडी बनवली म्हणून नवीन बाबा रागवले.” नवीन बाबा? आणि त्यांनी ह्या एवढ्या लहान मुलाला थोबाडीत मारली? बाईंना खूप रडू फुटलं. "नीमा मोठी झाल्यावर, मला नवीन आई तर म्हणणार नाही ना?"

या पावसात, समीरच्या होड्यांनी नात्यानी दुरावलेली सावत्र मुलगी नीमा मात्र, जवळची झाली...

Thursday, April 6, 2017

90

नव्वदी च्या दशकातला संदर्भ मला पटकन लागतो.

काका म्हणून घ्यायला कदाचित हे कारण पुरेसं असावं, जरी आवडत नसलं. 1990' नंतर जन्मलेली कार्टी तर हक्काने (पण कुठल्या) काका म्हणतात.त्या हाकेत मान किंवा आदर शोधू नये, असतो तो फक्त उपहास!

कुठला तरी शोध, कुठली तरी घटना, सचिनची इनिंग, पहिली नोकरी, नव्वदी म्हटलं की एकदम आज पहाटे किंवा फारतर कालच्या दिवसभरात घडलंय असं वाटतं. मी आपसूक मला माहित असेलल्या गाळलेल्या जागा भरतो आणि समोरच्याला अधिक माहिती देऊन त्याच्या ज्ञानात भर टाकतो. काकागिरी यालाच म्हणतात का? माहित नसेल तर हे खरच 90' मध्ये घडलंय का, मला कसं माहित नाही? असा चित्तगुप्तसारखा प्रश्न विचारतो. बोटांतल्या फटीं नी घात केला.

किशोर कुमार ची गाणी सोडली तर 70'-80' बद्दल काही आकर्षण नाही, 2000'-आत्ता पर्यंत च्या काळाचा असा हृदयस्थ जिव्हाळा नाही. 2000 नंतर खरं तर आयुष्याची लढाई सुरु झाली.
 गावस्कर वेंगसरकर हे परग्रहावरचे वाटतात, कपिलच्या रिटायरमेन्ट दिवस, शास्त्री रिटायर हो चे बोर्डस आठवतात पण हे सगळं लांबच्या नातेवाईकसारखं देखल्या देवा...

एवढं नक्की, की 70' व 80' मध्ये रमणाऱ्यांना कधी हिणवायला 'काका' केलं नाही.

कोणीतरी आगाऊ पणे धक्का मारून 'काका, 2017 चालू आहे, 90 संपून 17 वर्ष झाली' अशी आठवण करून द्यायच्या आत स्वतःला जागा करतो.

पण राहून राहून मी...

90चा माझ्या आयुष्यातला जिगसॉ पझलचा तुकडा आजही काढतो, कुरवळतो आणि परत लाऊन ठेवतो.

Monday, October 24, 2016

बायको 'करती' झाली

किती एक गोष्टी करायच्या राहिल्या. किती एक गोष्टी मनात राहिल्या.

खूप कार्य पार पाडली, पण 'मनात'. दिवास्वप्नात खूप टाळ्या, पाठीवरल्या थापा अनुभवल्या. आवडत्यांच्या कौतुकावर स्वार होउन तोच स्वप्नील अनुभव खरा असं मानलं.

खिशातून पैसे न काढता, समोरच्याला याचक 'बनवून' त्याचं वैचारीक गरीबी निर्मुलन केलं. कित्येकांना लांबून सल्ले, कित्येकाना मार्गदर्शन - जीवनांच ध्येय वगैरे वगैरे...

सर्वांना समजवून सांगणं हा अधिकार, लिमिटेड जगाचा लिमिटेड अनुभव, तरीही इतरांपेक्षा जास्त. म्हणून अधिकाराचं कर्तव्यात रूपांतर. वर, ज्ञानाचा उपयोग करून घेईल तो शहाणा, न घेईल तो आडमुठा, हा न्याय!

क्रिटीक बाय प्रोफेशन अँड नेचर
ओळखीत कोणी तरी काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करत असतं. पण त्यातले तोकडेपण शोधलं. फीडबॅक मागणाऱ्याला 'मनापासून' देऊन उपकृत केलं. फीडबॅक न मागणाऱ्याला तो कुठल्या तरी मार्गाने तो पोहोचेल अशी व्यवस्था केली,  ज्यांना थेट सांगता येणार नाही त्यांच्या कामाचं जाहीर पृथ्थकरण केलं. रांगत्या बाळकडूनही फ्लॉलेस डिलीव्हरीची अपेक्षा!

आणि समजूत करून-करवून घेतली की हाच देव, हेच कार्य.

जेव्हा हात मातीत घालायची वेळ आली, तेव्हा वेळ नाही, त्राण नाही, सवड नाही, कपडे घाण झाले तर बायकोला त्रास, अनेक चिकटपट्ट्या. मातीत चिकटपट्टी काम करत नाही.

काय केलं, काय नाही, पण या 'नाही' ला खोडत, बायको 'करती' झाली

Tuesday, October 11, 2016

पुलं आबा


एकदाच जवळून बघितलं होतं. दादरच्या सावरकर स्मारकात बाबुराव पेंटरांच्या चित्रांचं प्रदर्शन लागलं होतं. मी एका चित्रात अडकलो होतो आणि एकदम बाजूच्या चित्रपाशी बरीच माणसं जमली म्हणून उत्सुकतेने बघीतलं. माझ्यापासून फारतर दीड फूटावर पुलं उभे होते. अगदी वाटलं काहीतरी बोलावं, नमस्कार करावा, स्पर्श करुन पहावा. पण एक शब्द फुटला नाही, नमस्कारासाठी ही हात वर उचलता आला नाही. पण माझ्या पायांनी 'माझी लायकी' दाखवत मला स्मारकाबाहेर काढलं. राहून गेलं.......
पण आज मी आणि माझ्या मुलाने जवळ जवळ पाऊण तास पुलंआबांच्या बरोबर साजरा केला आणि आमचा दसरा गोड झाला।
इतरांसारखा सेल्फी (मुलाच्या शब्दात छेपी) काढता आला असता, पण आजही ............ ' माझी लायकी नाही!'

Friday, December 11, 2015

100 things you must see before you die...

I often see Kites from a close distance, one even tried to attack me. It was SLR conscious, I assume. I don't want to do Kites' claws test on my lens, anymore.

But I see Kite's feathers very clearly and sometimes even a rodent, a lizard tightly held in the claws.
Today, an Kite flew so low, over my head, I could see the rat's face... Again a great moment left uncaptured.

I saw the wide open eyes of the rat. But couldn't understand the facial expressions, was it happy to see the aerial view of its world, trying to enjoy its last few moments of life... 


100 things you must see before you die...


I was shocked to see a body lying on the service road of express highway early in the morning. From the distance, I could see a lady sitting nearby. My first instinct was to cross the barricade, cross the road and go to the service road on the opposite side. Then it occurred to me, I must help them. I continued on the same side. After a few steps, I saw some movement, the feet were moving.

So it was still alive. Few more steps and I could see the lady talking to the person. “They definitely need my help.”… or do they? In Delhi, I have seen many families staying along the roadside, “ are they one of those types?”

Finally, I when reached there, the old man had concluded his “shavasan” and was ready to go back home.

"हे विश्वचि माझे घर"

सदर १ः मनाशी संवाद टेलेपॅथी (दूरमनोसंप्रेषण) च्या नेटवर्क वर तीन मेंदूचा संवाद घडवून आणला गेला काही दिवसांपूर्वी ! मेंदूच्या लहरी समजण...